Edition

भाजपाचे पदाधिकारी, बुथ प्रमूख व कार्यकर्ते यांनी एस. आय. आर. (विशेष सखोल पुनरीक्षण) मोहिमेत सक्रियपणे कार्यरत रहावे. भाजपा ची मुलतत्वे आत्मसात करुन कामाला लागावे, येणाऱ्या उरुण ईश्वरपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन होवून भाजपाचा आमदार विजयी होईल, – आमदार श्री. धैर्यशील कदम (दादा)

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपूर प्रतिनिधी – शासनाच्या वतीने मतदार याद्याचे एस. आय. आर. मॅपिंग चे कामकाज सुरू असुन या मतदार नोंदणी बाबत कार्यकर्ते यांनी सक्रिय पणे कार्यरत रहावे. शासनाच्या निरनिराळ्या योजना लाभार्थी पर्यंत पोहोचवा, विविध विकास निधी बाबत सर्वजन मिळून सर्वांगीण विकास करु , भाजपा ची मुलतत्वे आत्मसात करुन कामाला लागावे, येणाऱ्या उरुण ईश्वरपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन होवून भाजपाचा आमदार विजयी होईल असे मत सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नुतन आमदार मा. श्री. धैर्यशील कदम (दादा) यांनी व्यक्त केले.

उरुण ईश्वरपूर शहरातील मा. श्री. आण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल च्या कार्यस्थळावर उरुण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व बुथप्रमुख कार्यकर्ते यांची आढावा बैठक संपन्न झाली.

प्रारंभी दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, भारत मातेच्या प्रतीमेचे पुज‌न उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सह सचिव मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू) यांनी केले.

सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल नुतन आमदार मा. श्री. धैर्यशील कदम (दादा) यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी नगराध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी माजी आमदार श्री. भगवानराव साळुंखे, भारतीय जनता पार्टी चे सांगली जिल्हाध्यक्ष मा. श्री. सम्राट महाडिक (बाबा), उरुण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी मा. श्री. राहूलदादा महाडिक, उरुण ईश्वरपूर चे माजी नगराध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सागरभाऊ खोत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. स्वरुपराव पाटील यांची भाषणे झाली. आगामी दिवसांत भाजपासाठी काम करावे, प्रत्येक मतदाराची नोंद मॅपिंगद्वारा झाली पाहिजे, सर्वांनी बी. एल. ओ. यांच्याशी संपर्क साधून मतदार नोंदणी सर्वात्तम करून घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी उरुण ईश्वरपूर मंडल अध्यक्ष श्री. संदिपराज पवार, आष्टा मंडल अध्यक्ष श्री अमर पडळकर, वाळवा मंडल अध्यक्ष श्री. अर्जून साळुंखे, माजी नगरसेवक श्री. अशोकराव देसाई, अँड. संपतराव पाटील, नगरसेवक अमित ओसवाल, राजवर्धन पाटील, राजेश माने, दयानंद चव्हाण, भाजपा युवा मोर्चाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. अभिजित रासकर, अँड. उमेश कोळेकर, के. डी. पाटील, डॉ ‌. सतिश बापट, सुमित पाटील, जयकर निकम, अर्जून धोत्रे, अजित पाटील, डी. वाय. तांदळे, प्रकाश कणप, धोंडीराम वाटेगावकर, प्रशांत यमगर, वसिम पटाण, तनविर चाऊस, धनंजय कारंडे, रमेश हराळे, बिरु बोते, संजय कुशिरे, पांडूरंग पाटील, मनोज खरात, अमोल विरकर, प्रविण गावडे यांच्या सह सर्व बुथ प्रमूख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आढावा बैठकीचे सुत्र संचालन श्री. बजरंग कदम यांनी केले. शेवटी आभार माजी नगरसेवक श्री. विक्रमभाऊ पाटील यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!