Edition

अक्षर दसोहा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इडलीचे वाटप; पौष्टिक आहाराचे महत्त्व अधोरेखित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रायबाग प्रतिनिधी : संभाजी चव्हाण,

अक्षर दसोहा योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराच्या सवयी रुजवून त्यांच्या निरोगी शारीरिक व मानसिक वाढीस हातभार लावणे हा आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इरागौडा पाटील यांनी केले.
शनिवारी रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती येथील न्यू कन्नड प्राथमिक शाळा तसेच आदर्श शिक्षण संस्थेच्या बाजीराव मगदुम्म हायस्कूलमध्ये अक्षर दसोहा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पौष्टिक इडलीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सकस आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी संस्थेचे संघटन सचिव ए. टी. कूगे, सदस्य धुलागौडा पाटील, अजित कामगौडा, अरिहंता कामगौडा, कुमारा कामगौडा, सीआरपी मुबारक ताशिवाले, मुख्याध्यापक अरुण सलगरे, एस. बी. बेन्नाडे, कुंतीनाथ मगदुम्म, रमेश बेलगली, प्रकाश बोलागोंडा, अण्णासाहेब अरविंद पाटील, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!