Edition

कुरळप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; विनापरवाना देशी दारू, गुटखा, मावा व ऑनलाइन कॅसिनो मटका चोरून चालू… कारवाईची नागरिकांची मागणी..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कुरळप प्रतिनिधी – कुरळप, ता. वाळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गावांमध्ये अवैध दारू, गुटखा, मावा आणि कॅसिनो ऑनलाइन मटका व्यवसाय चोरून जोमात सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, या अवैध धंद्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील अनेक पानटपऱ्यांवर बंदी असलेल्या गुटख्याची चोरून खुलेआम विक्री सुरू आहे. पाच रुपयांची पुडी दहा रुपयांना, दहा रुपयांची पुडी पंधरा रुपयांना तर पंधरा रुपयांची पुडी तीस रुपयांना विकली जात असल्याचा आरोप आहे. या व्यवसायाला मोठ्या रॅकेटचा पाठिंबा असून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा पुरवठा केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या रॅकेटचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याशिवाय, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मोठ्या प्रमाणात मावा तयार केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या माव्यात नशायुक्त रसायनांचा वापर केला जात असल्याचे सांगितले जात असून, त्याची विक्री परिसरातील अनेक पानटपऱ्यांमधून चोरून विक्री होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
परजिल्ह्यातील काही व्यक्तींकडून या भागात येऊन मटका व्यवसाय चालविला जात असल्याचीही चर्चा आहे. तसेच ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, कुरळप, लाडेगाव, इटकरे आणि कुरळप परिसरात अवैध विनापरवाना देशी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काही ठिकाणी मंदिर परिसर शाळा जवळच अवैध व्यवसायाचे विक्री होत आहे.

विशेषतः कुरळप ऐतवडे बुद्रुक येथे गेल्या काही वर्षांपासून चोरून अवैध दारूविक्री गुटखा ,मावा वाढली असून, आसपासच्या गावांतील ग्राहकही येथे येत असल्याने हे गाव अवैध दारू विक्रीचे केंद्र बनत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भांडणे, घरगुती कलह, सार्वजनिक शांततेचा भंग आणि युवकांमध्ये वाढते व्यसन यांसारख्या समस्या निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नुकतेच कुरळप पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चोरून अवैध विना दारू, गुटखा, मावा व केसिनो मटका व्यवसायावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!