Edition

गांधीनगर ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण सुरू, अतिक्रमण काढण्याची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर : प्रतिनिधी
उदय साळुंखे

गांधीनगर (ता. करवीर) येथील सि.स.नं. २६५७ या बेकायदेशीररित्या सनद काढलेल्या भूखंडावरील आरसीसी प्लिंथ व पत्र्याचे शेड काढावे, याशिवाय अन्य अतिक्रमणेही काढावीत व ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ गांधीनगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते अनिल जयसिंग हेगडे यांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाचा गुरुवार दुसरा दिवस आहे.
या बेकायदा अतिक्रमित बांधकामाबाबत कारवाई व्हावी, यासाठी हेगडे यांनी करवीरचे गटविकास अधिकारी, गांधीनगरचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे
निवेदनाद्वारे मागणी केली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई ग्रामपंचायत प्रशासनाने केली नसत्याने हेगडे यांनी आमरण उपोषण सुरू केले.
दरम्यान, सरपंच संदीप पाटोळे व ग्रामपंचायतचे लिपिक काकासाहेब हावळ यांनी हेगडे यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावे, अशा विनंतीचे पत्र स्वीकारण्याची विनंती केली. पण हेगडे यांनी पत्र घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, की प्रथम अतिक्रमणे काढा. मगच उपोषणाबाबत निर्णय घेऊ, असे सांगत आमरण उपोषण मागे न घेण्याचा त्यांनी
पुनरुचार केला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!