Edition

समाधानी जीवनासाठी नीती आवश्यक – पद्मनाभ महाराज व्यास.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू: मानवी जीवनात धर्माचरणाचे नित्य नियम पाळणारी व्यक्तीच आनंदाने जीवन जगु शकते . विषयासक्त व्यक्तींना सुख मिळत नाही. मानवाचे वाईट कर्मच त्याला दुःख देतात. त्यामुळे मानवी जीवनात कायम आनंदी व समाधानी राहण्यासाठी नीती आवश्यक असल्याचे, प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले आहे. पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे चौथे पुष्प पद्मनाभ महाराज व्यास यांनी मंगळवार ( दि.१६ ) जुन रोजी शहरातील ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात गुंफले.
भाविकांना आशिर्वचनपर बोलताना पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की,”कोणी आपल्याशी कितीही वाईट वागो. आपण त्याच्याशी चांगले वागले पाहिजे.आपले नित्य कर्म चांगले असले पाहिजे.बाल वयापासूनच संत साहित्याचे वाचन व श्रवण करायला हवे. जेणे करून नितीधर्म सहजपणे जोपसाला जाईल . माणूस नितीने वागला तर त्याला जे मिळते ते चिरंतन असते.”असेही ते म्हणाले. कथेच्या प्रारंभी यशवंत चारठाणकर यांनी अभंग गायन केले.सुत्रसंचलन अनिल रत्नपारखी यांनी केले. श्रीमद् भागवत कथेत डॉ.एस.एम.लोया, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती,पांडुरंग ढवळे,सत्येद्रराव चौधरी, देवीदास देऊळगावकर, जयंतराव पालवणकर, लक्ष्मीकांत कुलकर्णी,पद्मा मोगल,विलासराव पाटील, नागनाथ गाडेकर, नागेश देशपांडे आदींच्या हस्ते आरती करण्यात आली. कथेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सनातन धर्मात मुली आणि महिलांना दुय्यम स्थान दिले असल्याचा चुकीचा आरोप होतो.मात्र हजारो वर्षे पुर्वीपासून ,आपले अध्यात्म आणि पुराणांनी स्त्री जन्माचे स्वागत करायला सांगितले आहे. मुलगी घराची लक्ष्मी, शोभा असते. मुलींना शिक्षण देणे. काळजी घेणे. मुलींचे व महिलांचे संरक्षण करणे. ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. असेही पद्मनाभ महाराज व्यास यांनी आशिर्वचनपर बोलताना स्पष्ट केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!