Edition

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष मोहिमेत ४१ गुन्हे दाखल, २९ आरोपींना अटक अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात विशेष मोहीम पावणेसहा लाखांचा माल जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली, वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, पुणे जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमिवर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यात दिनांक २९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व निरीक्षक क्षेत्रांतर्गत एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान एक वाहन आणि इतर मुद्देमालासह एकूण रु. ५,७१,७६५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये देशी मद्य (Country Liquor): ५७.३२ बल्क लीटर, हातभट्टी मद्य (Illicit Liquor): १०१५.०० बल्क लीटर, विदेशी मद्य (IMFL/Beer – In State): ३.७२ बल्क लीटर, ताडी (Toddy): २५०.०० बल्क लीटर इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर रसायन / (Wash): १०१२०.०० बल्क लीटर जागीच नाश करण्यात आले.
विभागामार्फत यापुढील काळातही जिल्ह्यातील अवैध मद्य व्यवसाय पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अशीच कडक कारवाई सुरू राहील, असे पत्रकात म्हटले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

traffic tail

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

error: Content is protected !!