Edition

विठू नामाच्या गजरात श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिरोळ : प्रतिनिधी : बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठू-रुक्माई, ज्ञानोबा, तुकारामांचा अखंड जय घोषात टाळ मृदुंगाच्या गजरात धार्मिक आणि भक्तीमय वातावरणात शिरोळात ह.भ.प. श्रीगुरु एकनाथ आप्पा वासकर महाराज यांच्या अधिपत्याखाली श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला.
अधिक मास निमित्त शिरोळातील वासकर वारकरी संप्रदाय आणि समस्त शिरोळकर नागरी यांच्यावतीने आयोजित श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची आज हनुमान मंदिर गावडे गल्ली येथे उत्साहात सुरुवात करण्यात आली.
सुरुवातीस श्री. विठ्ठल रुक्माई, संत श्री. ज्ञानेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. आप्पासो पुजारी यांच्या हस्ते व सर्व वासकर वारकरी संप्रदाय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत विणा पूजन करण्यात आले.
श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे, पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील,उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, नगरसेवक ओंकार गावडे, सचिन शिंदे, निलेश गावडे, माजी नगरसेवक पै. प्रकाश गावडे, आनंदराव माने देशमुख, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजपुजन करण्यात आले.
ह.भ.प. कृष्णात पाटील व वारकऱ्यांनी पंचपदी केल्यानंतर व्यासपीठ चालक ह.भ.प. श्रीगुरु एकनाथ आप्पा वासकर महाराज यांच्या उपस्थितीत श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात करण्यात आली.
दुपारी विठू माऊली भजनी मंडळ शिरोळ यांचे भजन संपन्न झाले. सायंकाळी ह.भ. प. सागर दिलीप राडे (मर्दवाडी) यांचे प्रवचन झाले. रात्री ह.भ.प. भिकाजी शिंदे (कासारवाडी) यांचे कीर्तन व श्री हरी भजनी मंडळ शिरढोण यांचे जागरभजन उत्साहात झाले.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहासाठी श्री हनुमान मंदिर येथे मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी चहा अल्पपोहार, दुपारी भोजन, सायंकाळी चहा, रात्रीचे भोजन याचे संयोजकांकडून उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच या अध्यात्मिक सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, उपाध्यक्ष रमेश गावडे, खजिनदार रमाकांत संकपाळ, ऑडिटर बाळासाहेब कोळी, स्वागताध्यक्ष दिलीपराव माने यांच्यासह वासकर वारकरी संप्रदाय, समस्त गावडे समाज आणि विविध क्षेत्रातील मान्यवर शहरातील प्रतिष्ठित नागरिक सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते या धार्मिक सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

1 thought on “विठू नामाच्या गजरात श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.”

Leave a Comment

और पढ़ें

“मोजणीला आले तर रक्त सांडू”: ऐतवडे खुर्दचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध, शेतकरी नेते हनुमंत पाटलांचा सरकारला थेट इशारा.. 2019 च्या महापुरात 85% गाव पाण्याखाली, महामार्ग झाला तर 100% गाव बुडणार; “आम्ही आत्महत्या करणार नाही, लढू” – भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकरी आक्रमक.

traffic tail
error: Content is protected !!