सदलगा प्रतिनिधी – अनिलकुमार डेक्कण्णवर, अरिहंत शुगर इंडस्ट्रीज लि. (पूर्वीचे ओम शुगर्स लि.), जैनापूर यांनी सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर केला आहे.
कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या प्रकटनात म्हटले आहे की, कारखान्यास गाळपास येणाऱ्या ऊसाला एकूण *रु. ४०००/- प्रती मेट्रीक टन* दर देण्यात येणार आहे.
*दराचे स्वरूप खालीलप्रमाणे :*
*१. ऊसाची पहिली उचल – रु. ३७५०/- प्रती टन*
*२. ऊसाची दुसरी उचल – रु. ५०/- प्रती टन*
*३. ऊसाची तिसरी उचल, गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये उत्पादित साखर विक्री दर सरासरी ५०/- पेक्षा जास्त राहिल्यास पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी – रु. २००/- प्रती टन*
सन २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला जास्तीत जास्त ऊस आमच्या कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन व्यवस्थापक संचालक, अरिहंत शुगर कारखाना, जैनापूर यांनी केले आहे.
*वार्ताहर, अनिलकुमार डेक्कण्णावर, सडलगा (नेज)*










