Edition

खासदार धैर्यशील माने यांची वाड्या-वस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत दिवाळी साजरी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शाहूवाडी (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष आदेशानुसार, दुष्काळग्रस्त व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी पार पाडला. शाहूवाडी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या सोनुर्ले पैकी धोंडेवाडी येथे त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. या वेळी एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी भारतीय बैठकीत जमिनीवर खाली बसत त्यांनी सर्वांसोबत झुणका-भाकरीचे जेवण केले. उपस्थित महिलांना फराळ वाटप केले.
​या वेळी कार्यक्रमास उपसरपंच बळवंत मुगडे, बाबा लाड, चंद्रकांत मुगडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रुकडी जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, संभाजीराव देसाई, ओमकार चौगुले, दादासाहेब गावडे, सागर कुंभार, दिनकर भोसले, धोंडीराम खोत, मन्नू खोत, आणि संजय खोत यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
​या दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी आरोग्याची हेळसांड, रस्ते व एसटी बसची अनुपलब्धता, तीव्र पाणीटंचाई, रेशनिंग व सातबारावरील नावे, तसेच वन्यप्राण्यांचा त्रास यांसारख्या विविध बिकट समस्या मांडल्या. या सर्व समस्यांवर खासदार धैर्यशील माने यांनी अत्यंत सकारात्मक व संवेदनशील भूमिका घेत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
​कोट !
​” सोनुर्ले पैकी धोंडेवाडी येथील रस्ते व दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच विशेष बैठक घेतली जाईल. तसेच गरजेनुसार जमिनींची अदलाबदल करून रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न सोडवला जाईल. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येवर मात करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून नवीन गाव तलावाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्यात येईल आणि गावकऱ्यांनीही पाणी अतिशय जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, सातबारा आणि वीजपुरवठ्याशी संबंधित अडीअडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही देतो.”
​— खासदार धैर्यशील माने
​या दौऱ्यादरम्यान राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे शुभेच्छा संदेश त्यांनी ग्रामस्थांपर्यंत पोहोचवले. खासदार माने यांच्या या लोकोपयोगी व संवेदनशील भूमिकेमुळे सोनुर्ले पैकी धोंडेवाडी येथील गावकऱ्यांमध्ये आनंदाचे व आशेचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

गोकुळ अध्यक्ष निवडणुकीचा सस्पेन्स कायम! हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश; चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार चार तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय; चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत, मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक

शिवरायांचा गौरवशाली इतिहास जिवंत करणारा अप्रतिम किल्ला. साताऱ्याच्या बाल शिवशिलेदारांची अनोखी कलाकृती, तन्मय आणि रुद्र अश्विनी प्रकाश वरक या बंधूंनी साकारला ऐतिहासिक गड-किल्ल्याचा देखणा नमुना

कष्टकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आमदार सदाभाऊ खोत यांनी जपली माणुसकी! रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बांधकाम मजुरांना फराळ व भेटवस्तूंचे वाटप; गावी जाता न आलेल्या विद्यार्थ्यांसोबतही साजरा केला दिवाळीचा आनंद.

traffic tail

गोकुळ अध्यक्ष निवडणुकीचा सस्पेन्स कायम! हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश; चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार चार तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय; चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत, मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक

error: Content is protected !!