Edition

सांगलीतही कोल्हापूर पॅटर्नने ऊसदर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन! आष्ट्यात राजारामबापू स्मारकासमोर शेतकऱ्यांची चटणी-भाकर दिवाळी; दोन दिवसांचा कारखानदारांना अल्टिमेटम.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नागपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ऊसदराचा तिढा सुटत असताना सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही. याच्या निषेधार्थ आष्टा येथे शेतकऱ्यांनी माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्या स्मारकासमोर चटणी-भाकर खाऊन अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. सांगलीतही कोल्हापूर पॅटर्नने ऊसदर जाहीर करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर भाऊ खोत यांनी दिला.
कोल्हापूर मध्ये पहिल्या टप्प्यात ३९०० रुपये, त्यानंतर १०० रुपये आणि साखरेचा दर प्रतिक्विंटल ४५०० रुपयांच्या पुढे राहिल्यास ४२०० रुपये प्रतिटन दर देण्याबाबत तोडगा निघाल्याचा दाखला देत खोत यांनी सांगलीतील साखर कारखानदारांच्या भूमिकेवर टीका केली. कोल्हापूरमधील आंदोलनानंतर तेथील ऊसदराचा प्रश्न मार्गी लागला; मात्र सांगली जिल्ह्यातील साखर सम्राट अद्याप मूग गिळून गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला.
सांगली जिल्ह्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे राजारामबापू, वसंतदादा, नागनाथअण्णा आणि बापू लाड यांचा उल्लेख करताना त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आजचे कारखानदार शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावर मौन बाळगून असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजारामबापूंच्या वारसांकडून चार-चार साखर कारखाने चालवले जात असताना शेतकऱ्यांच्या उसाला किती दर देणार, याबाबत एक शब्दही बोलला जात नसल्याचे ते म्हणाले.
दिवाळीच्या दिवशीही कारखानदारांनी ऊसदर जाहीर न केल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी राजारामबापू स्मारकासमोरच घरून आणलेली चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी केली. कारखानदारांच्या वारसांना सद्बुद्धी मिळावी आणि शेतकऱ्यांचे भले व्हावे, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
येत्या दोन दिवसांत कारखानदारांनी ऊसदर जाहीर केला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करून मोठे आंदोलन उभारले जाईल. कोल्हापूरच्या धर्तीवर सांगलीतील शेतकरीही संघटित होऊन ऊसाला योग्य दर मिळवून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा सागर भाऊ खोत यांनी दिला. विशाल क्रांती वृत्तसेवा आष्टा सांगली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

गोकुळ अध्यक्ष निवडणुकीचा सस्पेन्स कायम! हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश; चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार चार तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय; चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत, मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक

शिवरायांचा गौरवशाली इतिहास जिवंत करणारा अप्रतिम किल्ला. साताऱ्याच्या बाल शिवशिलेदारांची अनोखी कलाकृती, तन्मय आणि रुद्र अश्विनी प्रकाश वरक या बंधूंनी साकारला ऐतिहासिक गड-किल्ल्याचा देखणा नमुना

कष्टकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आमदार सदाभाऊ खोत यांनी जपली माणुसकी! रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बांधकाम मजुरांना फराळ व भेटवस्तूंचे वाटप; गावी जाता न आलेल्या विद्यार्थ्यांसोबतही साजरा केला दिवाळीचा आनंद.

traffic tail

error: Content is protected !!