Edition

कोल्हापूर : गोकुळ अध्यक्षपदी राजेश पाटील विजयी; शशिकांत पाटील-चुयेकर यांचा १६ विरुद्ध १३ मतांनी पराभव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रविण केर्ले

कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसप्रणीत समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांचा १६ विरुद्ध १३ मतांनी पराभव केला.

गोकुळच्या निवडणुकीत २५ संचालकांपैकी समविचारी आघाडीने १३ जागा, तर महायुतीने १२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे संचालक मंडळात समविचारी आघाडीचे संख्याबळ अधिक होते. मात्र अध्यक्ष निवडीच्या वेळी आवश्यक गणपूर्तीचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकारने गोकुळच्या संचालक मंडळावर शासननियुक्त संचालकांची नियुक्ती केली; त्यापैकी चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.

या शासननियुक्त संचालकांच्या मतदान अधिकाराला सतेज पाटील गटाने न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे २५ निवडून आलेले संचालक आणि चार शासननियुक्त संचालक अशा एकूण २९ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.

अखेर झालेल्या मतमोजणीत राजेश पाटील यांना १६ तर शशिकांत पाटील-चुयेकर यांना १३ मते मिळाली. त्यामुळे राजेश पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. या निकालामुळे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाला धक्का बसला आहे. संचालक मंडळात १३ जागा मिळवूनही समविचारी आघाडीला अध्यक्षपद मिळवता आले नाही; शासननियुक्त संचालकांच्या मतदानामुळे अध्यक्षपदाचे गणित बदलले. आता या निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

गोकुळ अध्यक्ष निवडणुकीचा सस्पेन्स कायम! हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश; चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार चार तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय; चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत, मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक

शिवरायांचा गौरवशाली इतिहास जिवंत करणारा अप्रतिम किल्ला. साताऱ्याच्या बाल शिवशिलेदारांची अनोखी कलाकृती, तन्मय आणि रुद्र अश्विनी प्रकाश वरक या बंधूंनी साकारला ऐतिहासिक गड-किल्ल्याचा देखणा नमुना

कष्टकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आमदार सदाभाऊ खोत यांनी जपली माणुसकी! रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बांधकाम मजुरांना फराळ व भेटवस्तूंचे वाटप; गावी जाता न आलेल्या विद्यार्थ्यांसोबतही साजरा केला दिवाळीचा आनंद.

traffic tail

गोकुळ अध्यक्ष निवडणुकीचा सस्पेन्स कायम! हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश; चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार चार तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय; चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत, मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक

error: Content is protected !!