Edition

जतच्या जनतेने प्रस्थापितांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशाल क्रांती वृत्तसेवा सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार राजकीय हल्लाबोल केला. ‘‘जतच्या जनतेने प्रस्थापितांना टप्प्यात आणून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला,’’ असा घणाघाती टोला लगावत पडळकर यांनी या विजयातून विरोधकांचे राजकीय गणित जनतेनेच उधळून लावल्याचा दावा केला.

विरोधकांचे नॅरेटिव्ह जनतेने मोडीत काढले

विजयानंतर माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले की, जतचा आमदार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उभा राहिला की त्याचा पराभव होतो आणि पुढे विधानसभेतही त्याला पराभवाला सामोरे जावे लागते, असे नॅरेटिव्ह विरोधकांकडून तयार केले जात होते. आपली उमेदवारी रोखण्यासाठी तब्बल सहा वेळा न्यायालयात जाण्यात आले, तसेच अर्ज छाननीवेळीही हरकती घेण्यात आल्या. मात्र, जतच्या जनतेने प्रस्थापितांची राजकीय मक्तेदारी मोडून काढत इतिहास बदलला, असे त्यांनी सांगितले.

शिपाई भरती प्रकरणाच्या चौकशीचा मुद्दा ऐरणीवर

जिल्हा बँकेतील वादग्रस्त शिपाई भरती प्रकरणावरही पडळकर यांनी भाष्य केले. या भरतीची चौकशी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेत विरोधासाठी विरोध न करता शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत पारदर्शक कारभार करण्यावर भर राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सत्तेत बसायचे की विरोधात, निर्णय वरिष्ठांचा

जिल्हा बँकेत भाजपने सत्ताधारी म्हणून सहभागी व्हायचे की विरोधी बाकांवर बसायचे, याचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. मात्र, बँकेतील कोणताही गैरप्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही पडळकर यांनी दिला.

या विजयामुळे सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, पडळकर यांच्या जयंत पाटलांवरील टीकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

traffic tail

error: Content is protected !!