Edition

कामेरी नाका परिसरातील खुनाचा गुन्हा उघडकीस! ईश्वरपूरच्या सुरज कांबळे खून प्रकरणातील दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशाल क्रांती प्रतिनिधी :
ईश्वरपूर (ता. वाळवा) येथील आंबेडकरनगर परिसरात झालेल्या सुरज महादेव कांबळे (वय ३१) यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. कापड दुकानात झालेल्या भांडणाचा व पूर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील साहिल अनिल कांबळे (वय २७) आणि अंकित मुकुंद कांबळे (वय ३०), दोघेही रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर यांना पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कापड दुकानात मयत सुरज कांबळे आणि आरोपी यांच्यात भांडण झाले होते. तसेच पूर्वी लग्न मोडल्याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने सुरज यांच्यावर लोखंडी कोयता आणि चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला. डोके, कपाळ, चेहरा, पोट आणि पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सुरज कांबळे यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी फिर्यादी आप्पासाहेब सिद्धनाथ कांबळे (वय ३३, रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी ईश्वरपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्तपणे आरोपींचा शोध सुरू केला.
दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी कासेगाव शहर परिसरात महामार्गालगत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कासेगाव ते कराड महामार्गावर हॉटेल ९६ कुळीसमोरील रस्त्यावर शोधमोहीम राबवली. यावेळी तेथे उभे असलेले साहिल अनिल कांबळे आणि अंकित मुकुंद कांबळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत कापड दुकानातील भांडण आणि पूर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून मनात राग धरून कोयता व चाकूने हल्ला केल्याची माहिती आरोपींकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
या संयुक्त कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे तसेच दोन्ही पथकांतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अवघ्या २४ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना जेरबंद केल्याने सांगली पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

traffic tail

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

error: Content is protected !!