Edition

ऊसदराच्या कोंडीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; तादुळवाडीत राष्ट्रीय महामार्गावर ऊस फेकून केला निषेध… किणी टोलनाक्यावर ‘आरपारची लढाई’; स्वाभिमानीचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इस्लामपूर :प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे तसेच ऊसदराच्या प्रश्नाकडे साखर कारखानदार आणि राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सांगली जिल्ह्यातील तादुळवाडी येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर ऊस फेकून निषेध व्यक्त केला. ऊसदराच्या प्रश्नावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, किणी टोलनाक्यावर ‘आरपारची लढाई’ लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखर कारखानदारांनी एकत्र येत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३६०० रुपये पहिली उचल देण्यावर एकमत केले आहे. मात्र, सध्याची साखरेची बाजारातील परिस्थिती पाहता हा दर शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे.
खुल्या बाजारात साखरेचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर साखर कारखान्यांचे उपपदार्थ असलेल्या बगॅस आणि मोलॅसिसचे दरही गगनाला भिडले आहेत. साखर आणि उपपदार्थांच्या माध्यमातून कारखान्यांना मोठा आर्थिक फायदा होत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र योग्य दर देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
साखर कारखानदार आणि सरकार संगनमताने शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या घामाला आणि कष्टाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. अन्यथा ऊसदराच्या प्रश्नावर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही जाधव यांनी दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, शंकरअण्णा पाटील, शिवाजी पाटील, संतोष शेळके, दत्तात्रय जाधव, साहेबराव पाटील, रामभाऊ जाधव, मानसिंग नागरे, प्रकाश देसाई, प्रदीप पाटील, आकाश साळुंखे, शहाजी पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

traffic tail

error: Content is protected !!