Edition

ऊस दरासाठी शरद जोशी विचार मंचचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेत ठोस तोडगा नाही

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी :

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी विचार मंचच्या माध्यमातून सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाचा आज दुसरा दिवस पार पडला. आंदोलनाच्या मंडपातच कार्यकर्त्यांची न्याहारी झाली. ऊस दरासंदर्भातील मागण्यांसाठी सर्व संघटना एक होऊन लढा देत असून, जोपर्यंत ऊस दराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे यांनी जाहीर केले.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, उत्तम पाटील, अमरसिंह दळवी आदींनी पाठिंबा व्यक्त केला. किसान सभेचे अमोल नाईक यांनीही कार्यकर्त्यांसह येऊन आंदोलनास पाठिंबा दिला. साखरेसह इतर उपपदार्थांना चांगले दर मिळत असतानाही कारखानदार एफआरपीशिवाय जादा दर देण्याचा कोणताही निर्णय घेत नाहीत, याबद्दल सर्व संघटनांच्या वतीने कारखानदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी वजन काट्यांमध्ये कशाप्रकारे फेरफार केला जातो, हे उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले आणि याबाबत कोणते उपाय करावेत, हेही समजावून सांगितले. यातून होणारी लूट कारखानदारांच्या वैयक्तिक संपत्तीतून वसूल करण्यात यावी, अशी मागणी रुपेश पाटील यांनी केली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले होते, परंतु कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये संघटनांच्या मागण्यांप्रमाणे विचार केला नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा शिवाजी माने यांनी दिला.

अर्जुनवाडी, तालुका गडहिंग्लज येथील प्रगतशील शेतकरी नारायण देसाई यांनी आंदोलनस्थळी येऊन संघटनेस मदत दिली. आजच्या आंदोलनात प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक, भगवान काटे, शिवाजी माने, ज्ञानदेव पाटील, जनार्दन पाटील, सदाशिव कुलकर्णी, बाळकृष्ण पाटील, संजय चौगुले, सुभाष मेटकर, अनिल पाटील, युवराज आडनाईक, डी. एस. पाटील, सुनील पवार, राजाराम पाटील, अजित पाटील, विश्वनाथ स्वामी, राजू पाटील, डोंगळे, बाचणीचे सरपंच नामदेव कारंडे, लक्ष्मण करपे आदींसह विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

traffic tail

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

error: Content is protected !!