
शारदीय नवरात्रौत्सव निमित्त पीएमसी कॉलनी राजेवाडी नाना पेठ येथील हालचाल तरुण मंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये गरबा आणि दांडिया कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटील (राधा मुंबईकर) यांच्या हस्ते मंडळाच्या देवीची आरती नुकताच करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सोनुभाऊ भोंडे, उपाध्यक्ष प्रेम दीपक गायकवाड, कार्याध्यक्ष प्रतीक खेत्रे खजिनदार अक्षय अवचिते, गोपी खेत्रे, उत्सव प्रमुख ओमकार संजयराव खेत्रे, ऋषी खेत्रे, दीपक उर्फ मल्ली गायकवाड,आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.











