Edition

कागदपत्रे कायदेशीर अन् व्यवहार पारदर्शक सोमराज देशमुख यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला खिळ घालण्याचा जाणीवपूर्वक डाव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चिकुर्डे – गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व देशमुख कुटुंबीय यांची सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी एक पद्धतशीर षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे. सकटे कुटुंबाने जमिनीबाबत केलेले आरोप पूर्णपणे कायदेशीर चौकटीबाहेरचे आणि दिशाभूल करणारे असून, केवळ सरकार कुटुंबीय यांच्या बदनामीचा डाव आखण्यात आल्याचे समोर येत आहे. हे संपूर्ण प्रकरण सध्या दिवाणी न्यायालयात प्रलंबित असताना, न्यायालयाच्या प्रक्रियेवर दबाव आणण्यासाठीच गावातील काही हितसंबंधी गटांकडून खोटा प्रचार केला जात आहे. असा प्रत्यारोप प्रा. वैभव बुड्डे, अनिल चिवटे, अतुल चव्हाण यांनी केला.
चिकुर्डे येथील आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
प्रा. बुड्डे म्हणाले, सरकार कुटुंबीय, निकटवर्तीयांनी आणि कायदेशीर सल्लागार यांनीकेलेल्या संबंधित जमिनीचा व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शक आणि महसूल विभागाच्या नियमांनुसार झालेला आहे. सर्व खरेदी-विक्रीची कागदपत्रे, नोंदणीकृत दस्तऐवज आणि सातबारा वरील नोंदी कायदेशीररीत्या वैध आहेत. असे असतानाही, सकटे कुटुंबाला काही राजकीय विरोधकांनी हाताशी धरून “जमीन लाटली” असा खोटा आणि सनसनाटी आरोप करण्यास भाग पाडले आहे. केवळ सोमराज देशमुख यांच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लावणे हाच यामागील एकमेव उद्देश असल्याचे दिसून येत आहे.
हा वाद सध्या न्यायालयाच्या कक्षेत आहे आणि न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सरकार कुटुंबीयांची गाव आणि पंचक्रोशीत जातीवादी असल्याचे विषयावरून असल्याचे खोटे आरोप पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र शेकडो एकर जमिनी गावातील गोर गरिबांना दान करण्याबरोबर प्रकल्पग्रस्त गाव उभारण्याला हजारो एकर जमीन या कुटुंबाने दान केली असून, या 4 एकरासाठी सरकार कुटुंबीय असे चूक करणे शक्य नाही. कायद्याला धरून व्यवहार करणाऱ्या या कुटुंबाविरोधात होत असलेले आरोप कधीच खपवून घेतले जाणार नाहीत.
यावेळी अनिल चिवटे म्हणाले, गोर गरीब जनतेला नेहमीच दातृत्वाची भूमिका पार पाडणारे सरकार कुटुंबा विरोधात असले आरोप गाव कधीच खपवून घेणार नाही. ज्या ठिकाणच्या जमिनीबाबत काही समाज कंटकांनी हे आरोप केले आहेत. त्या गावात जाऊन सर्वत्र सर्व्हे करून पहावे, आणि माहिती घ्यावी. तेंव्हा सरकार कुटुंबीयांवर होत असलेले आरोप हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे समजेल. पण आता याविरोधात गावात संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा प्रवृत्तीविरोधात योग्य ती पावले उचलली जातील.
यावेळी ग्रा. पं. सदस्या वर्षा चव्हाण म्हणाल्या, सरकार कुटुंबीयांनी आमच्या मातंग कुटुंबासाठी हौसिंग सोसायटी उभारून पिढ्या पिढ्या निवाऱ्याची सोय केली आहे. आमच्या मागासवगीर्य समाजाबरोबरच गावासाठी आणि गावातील अनेक गरजूंना त्यांनी आर्थिक व मानसिक आधार दिला आहे. आणि आजही देत आहेत. असे सरकारचे कुटुंबांचे असलेले दातृत्व सर्वपरिचित आहे. आज त्या कुटुंबीयांवर जमीन प्रकरणातून होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. लवकरच न्यायालयात हे सिद्ध होईल… आणि त्यांचे पितळ उघडे पडेल.
या पत्रकार परिषदेमध्ये चर्चे दरम्यान न्यायालयात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार हे स्पष्ट असल्यानेच, विरोधक आता न्यायालयीन प्रक्रियेची वाट न पाहता गावात आणि सोशल मीडियावर देशमुख सरकार यांच्याविरोधात कुभांड रचत आहेत. गावातील वातावरण दूषित करून सोमराज देशमुख यांची नाहक बदनामी करणे हा न्यायप्रविष्ट बाबींचा एक प्रकारे अवमानच आहे, असा सूर सुजाण नागरिकांमधून उमटत आहे.
सोमराज देशमुख (सरकार) यांनी आजवर गावात अनेक सामाजिक आणि विकासकामे केली असून, त्यांची सर्वसामान्यांचे कैवारी म्हणून ओळख आहे. म्हणूनच, या खोट्या आरोपांनंतर गावातील बहुतांश नागरिक आणि देशमुख यांचे पाठीराखे त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले आहेत. “कितीही षडयंत्रे रचली, तरी सोमराज देशमुख सरकार यांचे सत्य आणि न्याय पक्षासमोरील चारित्र्य डागाळता येणार नाही,” असा विश्वास या मान्यवरांनी व्यक्त केला आहे. न्यायालयीन लढाईत सत्य लवकरच समोर येईल आणि बदनामी करणाऱ्यांचे चेहरे उघडे पडतील, असा ठाम विश्वास देशमुख समर्थकांनी व्यक्त केला आहे.

चौकट:
“ज्या व्यक्तीने स्वतःच्या मालकीच्या मौल्यवान जमिनी गावाच्या विकासासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी हसतमुखाने दान केल्या, ती व्यक्ती कोणाची जमीन बेकायदेशीरपणे लाटण्याचा विचारही करू शकत नाही. सोमराज देशमुख (सरकार) यांच्यावर होत असलेले आरोप हे केवळ त्यांच्या दातृत्वाच्या आणि स्वच्छ प्रतिमेला मत्सरापोटी गालबोट लावण्याचा प्रकार आहे.”
— अतुल चव्हाण, वर्षा चव्हाण, चिकुर्डे.

कोट:
न्यायालयात सर्व सत्य समोर येईल.!
सदर जमीन प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याबाबतचा खटला न्यायालयात सुरू असून, याविषयावर बोलणे चुकीचे ठरेल. सरकार कुटुंबीयांनी केलेले व्यवहार हे कायद्याला धरून आणि पारदर्शी आहेत. ही लवकर न्यायालयात सिद्ध होईल.
आनंदराव माळी, वकील.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!