पंढरपूर:प्रतिनिधी – पंढरपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. स्थानकावर येणाऱ्या भाविक आणि प्रवाशांना शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांची दमछाक होत असून, रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे आणि प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.











