Edition

वाळवा-शिराळा दुष्काळग्रस्त यादीतून वंचित; सोयाबीन जाळून स्वाभिमानी व प्रहार शेतकरी संघटनेकडून निषेध.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाळवा-शिराळा दुष्काळग्रस्त यादीतून वंचित; सोयाबीन जाळून स्वाभिमानी व प्रहार शेतकरी संघटनेकडून निषेध,
राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला असला, तरी सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी व प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत खराब झालेल्या सोयाबीनची तहसील कार्यालयासमोर होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला.
वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील अनेक भागांत पिकांना अपेक्षित पाऊस न मिळाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला आहे. उत्पादन हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, अशा परिस्थितीत दोन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर नुकसान झालेल्या सोयाबीनची होळी करून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी नेते भागवत जाधव यांनी सरकारने वाळवा आणि शिराळा तालुक्यांच्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
जाधव म्हणाले, “राज्यातील 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. मात्र वाळवा आणि शिराळा तालुके दुष्काळापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे खराब झालेल्या सोयाबीनची होळी करून आम्ही सरकारचा निषेध केला आहे.”
वाळवा आणि शिराळा तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती आणि मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही जाधव यांनी दिला.
“मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने वाळवा आणि शिराळा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत. अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त यादीत दोन्ही तालुक्यांचा समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

error: Content is protected !!