Edition

जयसिंगपूर नगरपालिकेत भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्र विकास सेना पक्षाचा दणका! आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एका कर्मचाऱ्याचे निलंबन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जयसिंगपूर ( प्रतिनिधी ) : जयसिंगपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सेवाशुल्कात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात मा.रोहन कोळी जिल्हाध्यक्ष राष्ट्र विकास सेना पक्ष यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात संबंधित एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तपास समिती नेमून तपास करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यातआले आहे .

राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर जी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने पक्षाचे जिल्हाध्यक्ष रोहन कोळी यांनी या प्रकरणाचा सातत्याने कायदेशीर आणि आक्रमक पाठपुरावा केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने देत , अखेर दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. याची गंभीर आणि दखल घेऊन नगरपरिषद प्रशासनाने संबंधित प्रकरणातील एका कर्मचाऱ्याला ताबडतोब दिनांक 23 सप्टेंबर रोजी निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीदरम्यान संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व त्यांच्या साथीदारांवर नियमानुसार विभागीय व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना विकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर जी गायकवाड यांनी दिली .
या कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्र विकास सेना पक्षाने उचललेल्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

रोहन कोळी म्हणाले,
“जयसिंगपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवला. राष्ट्र विकास सेना पक्ष्याचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर जी गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली आमच्या टीमने योग्य तो पाठपुरावा केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी देखील विशेष प्रयत्न केले. प्रशासनाने याची दाखल घेत एका कर्मचाऱ्याचे निलंबन करून तपास समिती नेमण्याची आश्वासन दिले आहे. आणि ही सुरुवात आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर नियमानुसार कारवाई होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!