Edition

कोल्हापूर महापालिकेला सीएसआर फंडातून साहित्याची मोठी मदत!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी :
उदय साळुंखे,शहरातील बैंक ऑफ बडोदा व बरंच काही फौडेशनच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेला १२७ एलईडी दिवे, ५ एलईडी स्क्रीन व २० संगणक संथ असे सुमारे १२ लाख रुपये किमतीचे साहित्य सीएसआरच्या माध्यमातून देण्यात आले. मा साहित्याचा लोकार्पण व हस्तांतरण कार्यक्रम आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे पार पडला. बैंक ऑफ बडोचाचे रिजनल हेड प्रकाश जाधव व बरंच काही फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप संकपाळ यांनी सदर साहित्य आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केले.

महानगरपालिकेच्या विविध

कार्यालयीन कामकाजासाठी २० संगणक संच, शहरातील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार वापरण्यासाठी ५ एलईडी स्क्रीन तसेच शहरातील प्रकाश व्यवस्थेसाठी १३७ एलईडी दिवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सीएसआरच्या झारलेल्या माध्यमातून उपलका झारलेल्या मा साहित्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाला तसेच नागरिकांना उपलब्ध करून देग्यात येणाऱ्या सुविधांना हातभार लागणार आहे. महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये सामाजिक संस्था, उद्योग व विविध आस्थापनांनी सीएसआरच्या माध्यमातून सहभागी होऊन शहराच्या विकासासाठी योगदान

द्यावे असे आवाहन यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

यावेळी अतिरिक्त आयुका रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त संजय रमेश मस्कर, सिस्टीम गनिजार सरनाईक, शहर अभियंता सशपालसिंग रजपूत, विद्युत अभियंता नारायण पुजारी, बैंक ऑफ बडोदाचे फ्रेंच हेड नीरज पांडे, अभिजीत खराडे, सूर्यकांत काळे, विनायक पोवार, बरंच काही फौंडेशनच्या अश्विनी संकपाळ, अरविंद माने, अर्जुन संकपाळ, दीप कांचळे, समर्थ संकपाळ, ओम ठिपुगडे आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!