Edition

इचलकरंजीत ३० हजारांची लाच घेताना मुख्य सेविकेसह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी — मिनाज सनदी

इचलकरंजी येथे ११ अंगणवाड्यांच्या शालेय अन्नपुरवठा योजनेची मागील सहा महिन्यांची थकीत बिले मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील मुख्य सेविकेसह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने कारवाईच्या जाळ्यात पकडले. तडजोडीनंतर ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले.
या प्रकरणात मेनका मनोहर माने-कोरवी (वय ४४, मुख्य सेविका, महिला व बाल विकास विभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, इचलकरंजी) तसेच दिपक दिनकर कांबळे (वय ४९, खासगी इसम, रा. कोळेकर बिल्डिंग, कोल्हापूर नाका, इचलकरंजी) यांच्याविरुद्ध इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
एसीबीकडे प्राप्त तक्रारीनुसार, बचत गटांमार्फत चालविण्यात येणाऱ्या ११ अंगणवाड्यांच्या मागील सहा महिन्यांच्या शालेय अन्नपुरवठा योजनेच्या थकीत बिलांना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीमागे दरमहा ५०० रुपये या प्रमाणे एकूण ३३ हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी २१ सप्टेंबर २०२६ रोजी पंचांसमक्ष करण्यात आली. यावेळी तडजोडीनंतर मुख्य सेविका मेनका माने-कोरवी यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान मुख्य सेविका मेनका माने-कोरवी यांनी लाचेची रक्कम स्वतःकडे न स्वीकारता त्यांच्या कार्यालयातील ठेकेदार दिपक दिनकर कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार ३० हजार रुपयांची लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना खासगी इसम दिपक कांबळे याच्यावर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
एसीबीच्या पथकाची
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार संदीप काशीद, पोलीस हवालदार सुधीर पाटील, महिला पोलीस हवालदार संगीता गावडे, पोलीस शिपाई कृष्णा पाटील, पोलीस शिपाई वैभव खोत आणि चालक सहाय्यक पोलीस फौजदार गजानन कुराडे यांच्या पथकाने केली.
लाच मागितल्यास तातडीने एसीबीशी संपर्काचे आवाहन
भ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर वैष्णवी पाटील पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.
मोबाईल : ९७६४१४०७७७
दूरध्वनी : ०२३१-२५४०९८९ / ९४०४३२१०६४
पत्ता : २१२०, शनिवार पेठ, कोल्हापूर.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधावा.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!