संजय आगाशे चंदगड प्रतिनिधी
कावळेवाडी :- चव्हाट गल्ली, कावळेवाडी येथील ‘स्वराज गणेश युवक मंडळ’ (स्थापना: २०१०, वर्ष १७ वे) यांच्या वतीने यंदाच्या सन २०२६ च्या गणेशोत्सवासाठी श्रींची मूर्ती 8 फूट गणेशमूर्ती बाचिकर हस्ते भेट दिल्याबद्दल,मंडळाचे आधारस्तंभ व प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर श्री सागर जोतिबा बाचीकर यांचा मंडळाच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला
या सत्कार सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष दयानंद यल्लुरकर यांच्याहस्ते श्री. सागर बाचीकर यांना मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मंडळाच्या कार्याला नेहमीच मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल आणि यंदा श्रींची मूर्ती उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष दयानंद यल्लुरकर, लक्ष्मण ओऊळकर, महेश कनबकर, मोहन ओऊळकर, सुनील कनबरकर,अनिल ओऊळकर,लक्ष्मण कनबरकर, दत्ता मोरे,मारुती मोरे,वैजू मोरे,अमोल यल्लाुरकर,मयन्ना गावडे, गवदू मोरे, गोविंद कनबरकर गणपत कनबरकर,तुकाराम सावंत,संकेत बाचीकर,सुरज कनबरकर,भरमाना मोरे, दिलीप यल्लूरकर यांच्यासह कावळेवाडीचे तरुण, प्रतिष्ठित नागरिक व मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.











