कोल्हापूर/प्रतिनिधी
उदय साळुंखे
कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेल्या टायगर ग्रुपने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले आहे. पैलवान सचिन (भाऊ) पाटील यांनी वाढदिवसाचा आनंद केवळ वैयक्तिक पातळीवर न साजरा करता, समाजातील गरजूंना मदत करून त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘एकटी’ संस्थेच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील गरजू ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य आणि ‘कोल्हापूर थाळी’चे भोजन वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे युवा नेते अविभाऊ कांबळे आणि आरपीआय माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष सनी भाऊ आजटे यांच्या पुढाकाराने संपन्न झाला.
या सामाजिक कार्यात टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष सुशांत कांबळे यांच्यासह आकाश जाधव, राजू माळगे, मेघराज पाटील, सुमित तराळ, अमर वळकुंजे, रोहन गायकवाड आणि गौरव कांबळे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसाचा दिवस सार्थकी लावत, या सर्वांनी ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत सामाजिक बांधिलकीचे उत्तम दर्शन घडवले आहे.











