गांधीनगर: प्रतिनिधी
उदय साळुंखे
उचगाव (ता. करवीर) येथे शनिवारी (दि.१९) रोजी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मंगेश्वर
मंदिर येथे सशस्त्र संचलन करून दंगल काबू पथकातर्फे प्रात्यक्षिके करण्यात आली.
आगामी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत पोलिस दृश्यमानता वाढून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच शांतता अबाधित राखण्यासाठी तसेच पोलीस फौजफाट्यासह संचलन करण्यात आले. त्यानंतर दंगल
काबू पथकाने प्रात्यक्षिक दाखवून मेन रोडसह मिरवणुकीतील चौकातून रूट मार्च करण्यात आला. यावेळी सपोनि अतुल कदम, उपनिरीक्षक विजय कोळी, रमेश महापुरे, आकाश जाधव, सरस्वती मोकाशी यांच्यासह एसआरएफ तुकडी, पोलीस, कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते.











