संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी – चंदगड : येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत राजगोळी येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने तसेच १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या विजयी संघात सिद्धेश सुकये, आयुष जाधव, विपुल कडकर, घोषित पिळणकर, आदित्य कांबळे, समर्थ लोहार, सक्षम शिरगे, रोहन कुंभार, गंधर्व कुंभार, धीरज फाटक व रणवीर आनंद यांचा समावेश आहे.
१९ वर्षे वयोगटातील मुलींच्या विजयी संघात जैनब मुल्ला, संचिता पाटील, शर्वरी मुंगारे, आदिती मेंगुळकर, दिशा गावडे, दीपाली इंगवले, सुनीता पाटील व संस्कृती गायकवाडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या दोन्ही संघांना क्रीडा शिक्षक प्रा. एन. डी. हडगल व श्री. टी. व्ही. खंदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन ॲड. प्रा. एन. एस. पाटील, प्राचार्य श्री. आर. पी. पाटील, उपप्राचार्य टी. एस. चांदेकर व पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर यांनी विजयी खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले.











