बेडकिहाळ प्रतिनिधी – राजू संकपाळ, शमनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा विविध उद्देशगळ ग्रामीण प्राथमिक कृषी पत्तीन संघाच्या सभागृहात शनिवार (ता 12) रोजी संघाचे संस्थापक जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडला.
या वेळी संघांचे अध्यक्ष जितेश खोत, जेष्ठ नेते उदयकुमार खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बी ए भोजकर, महावीर नागावे, विकी खोत, अभिषेक खोत, अण्णासाहेब भेंडवाडे उपस्थित होते. संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या सभे प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष जयकुमार हेरगे यांनी केले. अहवाल सालातील मयत सभासद, शहिद वीर जवान, विविध क्षेत्रातील मान्यवराना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संस्थापक जयकुमार खोत अहवाल वाचन करताना म्हणाले संस्थेचे एकूण सभासद – 1042 असून, शेअर भांडवल – 30 लाख 58 हजार 200, आहे तर निधी – 3 कोठी 34 लाख 17 हजार, तर ठेवी – 20 कोठी 17 लाख 20 हजार.तर गुंतवणूक – 5 कोठी 75 लाख 55 हजार, तर कर्ज वितरण – 15 कोठी 27 लाख 36 हजार. तर खेळते भांडवल – 25 कोठी 99 लेखावर आहे . तर वार्षिक उलाढाल – 125 कोठी च्या वर आहे. संघाला – 77 लाख 7 हजारावर निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 16 टक्के लाभावंश देण्यात येणार आहे. 97 टक्के कर्ज वसुली प्रमाण आहे. तर संघाचा ऑडिट वर्ग “अ ” मिळाले असल्याची माहिती जयकुमार खोत यांनी शेवटी सांगितले.
सदलगा अर्बन बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल डॉ बी ए भोजकर, तसेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल महावीर नागावे व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जयकुमार खोत यांच्यासह दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या मुला मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी अण्णासाहेब भेंडवाडे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
नफा तोटा, पत्रकार सह अंदाज पत्रिकका, ताळेबंद पत्रकाचे वाचन व्यवस्थापक बाबासाब वडेर यांनी केली, यास सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरी दर्शविली.
सभेस संघाचे संचालक महावीर पारिसखोत, राजू कमते, बाहुबली सोमणखोत, ॲड संतोष वडेर , बापूसाहेब शिंदे, भरमा पुजारी, बाळासाहेब येडूरे, अजित गड्यापखोत, बनप्पा भानुसे, सौ ज्योती खोत, सुचिता उमाजे, आंनद माने, सचिन नागावे, अजित कोरूचे यांच्यासह राजकुमार खोत, पद्माकर खोत, आण्णासाहेब तारदाळे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष भाऊसाब खोत, सुभाष पाटील, प्रद्युमन खोत, जयकुमार मुरचिट्टे, बाहुबली शिरगुप्पे , कुमार बेडगे, मनोहर खोत तसेच प्राथमिक कृषी संघ, पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संघाचे सर्व सदस्य संचालक मंडळ,पदाधिकारी, संघाचे सभासद व कर्मचारी वर्ग माजी ग्रामपंचायत सदस्य उपथित होते. सूत्रसंचाल मुख्य व्यवस्थापक बी के वडेर यांनी केले तर आभार शितल खोत यांनी मानले.











