मलिकवाड (ता.चिकोडी,जि. बेळगाव) येथील कै.श्रीमती मंगल नायकु माने यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन.
कै. मंगल माने यांचे दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने माने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रेमळ स्वभाव, आपुलकीची वागणूक, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांच्या आठवणी आजही परिवाराच्या मनात कायम आहेत.
१३ सप्टेंबर रोजी तिथीप्रमाणे त्यांचे द्वितीय पुण्यस्मरण करण्यात येत असून, या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.
आईचे प्रेम, माया आणि संस्कार यांची जागा आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. आई आज आपल्यात नसली तरी त्यांनी दिलेले संस्कार, प्रेम आणि आठवणी सदैव आपल्या सोबत राहतील. त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना डोळ्यांत अश्रू आणि मनात त्यांच्या आठवणींची कायमची शिदोरी राहील.
“शरीराने दूर गेलात, तरी आठवणींतून सदैव आमच्यासोबत आहात.
तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
भावपूर्ण श्रद्धांजली!
🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
विशालक्रांती न्यूज.
चिकोडी तालुका प्रतिनिधी –
श्री.अमर माने, मलिकवाड.
ता. चिकोडी, जि. बेळगाव.












