Edition

चंदगड तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कडक भूमिका,नूतन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा इशारा; ‘पोलीस मित्र’ची संख्या वाढवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी – चंदगड : चंदगड तालुक्यातील अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सामाजिक उपद्रवांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नूतन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे ही पोलिसांची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.

चंदगड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दारू विक्री, मटका-जुगार तसेच इतर अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अशा प्रकारच्या गैरकायदेशीर कारवायांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

 

तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पोलिस प्रशासनासोबत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी ‘पोलीस मित्र’ची संख्या वाढविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गावागावांत नागरिकांशी समन्वय वाढवून संशयास्पद हालचाली, अवैध धंदे किंवा गुन्हेगारी प्रकारांची माहिती पोलिसांपर्यंत तातडीने पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

 

पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत झाल्यास गुन्हेगारीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल. त्यामुळे नागरिकांनीही आपल्या परिसरातील गैरप्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

“तालुक्यातील अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सामाजिक उपद्रवांवर प्रभावी कारवाई केली जाईल. कायद्याचे पालन आणि नागरिकांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे,” असा संदेश पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिला आहे.

चंदगड तालुक्यात ‘सुरक्षित चंदगड, समृद्ध चंदगड’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित समाज आणि मजबूत पोलीस व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अवैध धंदे अथवा कोणत्याही गुन्हेगारी प्रकाराची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे नूतन पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेमुळे तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!