Edition

वार्षिक सभेतच हृदयविकाराचा झटका; माजी संचालकाचे निधन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चंदगड : सुरुते (ता. चंदगड) येथे ब्रम्हलिंग विविध सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेदरम्यान विद्यमान संचालक तथा माजी उपाध्यक्ष कृष्णा चाळो भुजबळ (वय ८८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.या घटनेमुळे वार्षिक सभेवर शोककळा पसरली.

संस्थेच्या वार्षिक सभेत कृष्णा भुजबळ हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. ते खाली कोसळल्याने उपस्थितांनी तातडीने त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.

कृष्णा भुजबळ हे संस्थेच्या कामकाजात सक्रिय होते. त्यांच्या निधनाने सहकारी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!