Edition

सदलगा पोलीस ठाण्याकडून 400 हून अधिक गणेश मंडळांना मार्गदर्शन – पीएसआय बसनगौडा नेरली यांच्या सूचना.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

सदलगा (प्रतिनिधी अनिलकुमार डेक्कण्णवर): सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीने सदलगा येथील गणेश मंदिरात सदलगा व परिसरातील 400 हून अधिक गणेश मंडळांच्या प्रमुखांची बैठक घेऊन गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सदलगा पोलीस ठाण्याचे पीएसआय श्री. बसनगौडा नेरली यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी दिलेल्या प्रमुख सूचना :

<span;><span;>- विजेच्या खांबावरून थेट वीज घेऊ नका, हेस्कॉमकडून अधिकृत परवानगी घेऊनच वीज वापरा.

<span;><span;>- जास्त उंचीच्या गणेश मूर्ती बसवताना योग्य ती काळजी व सुरक्षेचे उपाय घ्या.

<span;><span;>- डॉल्बी लावण्यास सक्त मनाई आहे.

<span;><span;>- ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) रात्री उशिरापर्यंत लावू नका.

<span;><span;>- फटाके फोडू नका.

<span;><span;>- कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने शांततेत गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन त्यांनी केले.

प्रत्येक गावासाठी दोन पोलीस कर्मचारी नेमले जातील, त्यांना सांगावे लागेल असे कोणतेही कृत्य करू नका आणि त्यांना सहकार्य करा, असेही त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर एएसआय लक्ष्मण कुंभार, मांगूरचे रमेश जाधव, गजानन कावडकर तसेच पोलीस कर्मचारी संजय जमकुळे, शरणप्पा कुंभार उपस्थित होते.

या बैठकीला सदलगा कर्नाटक रक्षणा वेदिकेचे अध्यक्ष संजीव लठ्ठे, बेडकिहाळचे दत्तकुमार पाटील, नामदेव पाटील, सदलगाचे विजय रामनकट्टी, रोहिणी हैद्राबादे, राजू वाली, राघवेंद्र देसाई, प्रतीक देसाई, उमेश मुत्नाळे, रमेश मुरगुंडे, निलेश वळकुंद्रे, गळतगाचे विजय तेलवेकर, कारदगाचे अनिकेत खोत यांच्यासह २८ गावांतील गणेश मंडळांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी एएसआय कुंभार साहेबांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!