Edition

यासेर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक जावेदखान फेरोजखान पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा गुलमोहर कॉलनी सेलूचे उपक्रमशील मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान पठाण यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना लातूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या कार्यातून जिल्ह्यात वेगळी ओळख असलेले व आदर्श मुख्याध्यापक जावेद खान फिरोज खान पठाण यांना परभणी जिल्ह्यातून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार सोहळा लातूर येथे 20 सप्टेंबर रोजी मराठवाडाचे शिक्षक व पदवीधर आमदार स्थानिक आमदार महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना चे सर्व राज्य पदाधिकारी व महाराष्ट्रातील इतर प्रतिष्ठित शिक्षण प्रेमी व मान्यवरांच्या उपस्थित हे पुरस्कार सोहळा होणार आहे. पठाण यांच्या निवडीचे मुख्याध्यापक श्याम मचाले, रहमान खान रहीम अन्सारी, शेख मुस्ताक जुबेर अन्सारी, शोएब हाशमी, जमील रंगरेज, मुनीब हनफी, युनुस अन्वर, मोरे एस एम, संजय भोकरे, शेख तौखिर ,कास्मी टी एस संजय ठाकर ,उबेद अन्सारी आदींनी स्वागत केले आहे. हा कार्यक्रम कॉकिसट कॉलेज अंबाजोगाई रोड लातूर येथे होणार आहे. पुरस्कार मिळाल्यामूळे त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!