Edition

चंदगड शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपंचायतीला अत्याधुनिक मैला उपसा वाहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी :
चंदगड शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने चंदगड नगरपंचायतीस मैला उपसा वाहन (Suction Vehicle) उपलब्ध झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान (२.०) अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे वाहन नगरपंचायतीला देण्यात आले आहे.

या वाहनाच्या माध्यमातून शहरातील सेप्टिक टँक व मैला उपसा करण्याचे काम अधिक जलद, सुरक्षित व प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतेशी संबंधित समस्यांपासून दिलासा मिळणार असून, शहरातील आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता या वाहनाचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपंचायतीला मिळालेल्या या सुविधेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी या वाहनाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांनी आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!