Edition

कृष्णा हॉस्पिटल येथे ५.८ किलोच्या गर्भाशयाच्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

परभणी : कृष्णा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, परभणी येथील डॉक्टरांच्या पथकाने एका महिलेच्या पोटातील ५.८ किलो वजनाची गर्भाशयाची गाठ यशस्वीरीत्या काढली आहे. संबंधित महिलेला गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पोट वाढण्याचा त्रास होत होता.
रुग्णालयात दाखल होईपर्यंत तिला अति रक्तस्राव होत होता आणि तीव्र रक्तक्षय झाला होता. तपासणीत ही गाठ ओटीपोटापासून थेट बरगड्यांपर्यंत पसरल्याचे आढळले. गाठीचा आकार पूर्ण दिवस भरलेल्या गर्भा एवढा होता. शस्त्रक्रियेपूर्वी तिला रक्त देऊन प्रकृती स्थिर करण्यात आली. मूत्रवाहिन्या व मूत्राशय यांना कोणतीही इजा न होता शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून रुग्णाची प्रकृती उत्तम आहे.शस्त्रक्रिया पथकाचे नेतृत्व कृष्णा हॉस्पिटलच्या संचालिका व स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. अपूर्वा रोडगे-पारवे यांनी केले. त्यांना डॉ. चैताली नेमनार यांनी सहकार्य केले. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. हारकळ सर* यांनी काम पाहिले. मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. सामिंद्रे सर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान मूत्रवाहिन्या सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य केले. शल्यचिकित्सक डॉ. सागर चौधरी व डॉ. पंढरी ठाकूर हे सहाय्यासाठी उपलब्ध होते. शस्त्रक्रियागृह व परिचारिका पथकाचे नेतृत्व केशव कदम यांनी केले.तपासणी, भूल, रक्तपुरवठा, शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेनंतरची देखभाल हे सर्व याच रुग्णालयात करण्यात आले.

रुग्णालयाचे संचालक व अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गणेश पारवे यांनी सांगितले की, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग आता स्वतंत्र शस्त्रक्रियागृह, 24 तास भूलतज्ज्ञांची सेवा आणि रक्तपेढी व्यवस्थेसह पूर्णपणे कार्यरत आहे. “जिल्ह्यातील रुग्णांना येथे सुरक्षितपणे मिळू शकणाऱ्या उपचारांसाठी मोठ्या शहरात जावे लागू नये, हाच आमचा प्रयत्न आहे. एकेक विभाग उभा करत ही क्षमता आम्ही स्थानिक पातळीवर निर्माण करत आहोत,” असे ते म्हणाले.महिलांनी पोट वाढणे किंवा अति रक्तस्राव याकडे दुर्लक्ष करू नये, वेळेत निदान झाल्यास असे आजार पूर्णपणे बरे होतात, असे आवाहन रुग्णालयातील डॉक्टरांनी केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!