Edition

श्री के.बा.विद्यालयात विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट प्रमाणपत्रांचे वाटप.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : दि २५ रोजी सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयासह शहरातील नूतन कन्या प्रशाला, न्यू हायस्कुल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत वर्ग ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक अरुण नागरे व पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे यांच्या नियोजनात पोलीस जमादार दीपक जंबुरे व दामिनी पथकाच्या हेड कॉन्स्टेबल अस्मिता मोरे यांनी आज श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके,प्रथा विभागाचे मुख्याध्यापक संजय धारसुरकर,जेष्ठ शिक्षक किशोर खारकर,डॉ जयश्री सोन्नेकर,धनश्री शिंदे आदींची उपस्थिती होती.
पोलीस जमादार दीपक जंबुरे यांनी दोन वर्षांचे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, रस्ता सुरक्षा, डायल ११२. सायबर हेल्पलाइन १९३०
व बाल गुन्हेगारी या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे कायद्याबद्दल आदर, सामाजिक जबाबदारी व आत्मनिर्भरता हे गुण शिकायला मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी
व्यक्त केली. याप्रसंगी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्याथ्यांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल आदर, सामाजिक जबाबदारी, सुसंस्कृत व आदर्श विद्यार्थी, सुजाण नागरिकता, आत्मनिर्भरता वा सर्व गुणांचा लाभ मिळाला असल्याची भावना व्यक्त केली.
पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल शिक्षक व शाळांनी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले,पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्यासह जमादार दीपक जंबुरे,जमादार अस्मिता मोरे यांचे कौतुक केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!