Edition

जिद्द, चिकाटी अन् संघर्षावर मात; सुरुलच्या अक्षय पवारची आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात भरारी:आमदार सत्यजित देशमुख यांच्याकडून ७५ हजारांची मदत; कझाकिस्तानमध्ये तिरंगा फडकविणाऱ्या मूकबधिर पैलवानाला बळ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा: सुरुल (ता. वाळवा) : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात झेप घेणाऱ्या सुरुलच्या सुपुत्राला आमदार सत्यजित देशमुख यांनी मायेचा आणि मदतीचा हात दिला. कझाकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या मूकबधिर पैलवान पै. अक्षय पोपट पवार याच्या घरी भेट देऊन देशमुख यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याच्या परदेश दौऱ्यासाठी स्वर्गीय स्व.शिवाजीराव देशमुख रूरल डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन शिराळा यांच्या वतीने ७५ हजार रुपयांचा धनादेश पवार कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.

अक्षयचा हा यशस्वी प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतही आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत त्याने गावातील जय हनुमान तालीम येथे घाम गाळला. परिस्थितीने अनेक अडथळे आणले, मात्र अक्षयने हार न मानता कुस्तीच्या सरावातून आपले ध्येय गाठले. आता कझाकिस्तानच्या मातीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना तिरंगा फडकविण्याची संधी त्याला मिळाली आहे.

अक्षयच्या आंतरराष्ट्रीय निवडीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समजल्यानंतर आमदार सत्यजित देशमुख यांनी त्याच्या घरी जाऊन त्याचे कौतुक केले. परदेशातील स्पर्धेसाठी येणारा मोठा खर्च पवार कुटुंबासाठी अडचणीचा ठरत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच पवार कुटुंबाच्या पाठीशी भविष्यातही खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

“आपल्या भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य वेळी पाठबळ मिळाले, तर ते जग जिंकू शकतात. अक्षयने आपल्या जिद्दीने हे सिद्ध केले आहे. कझाकिस्तानमध्ये तो नक्कीच चमकदार कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करेल,” असा विश्वास आमदार सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केला.

युवा सहकारी सागर खोत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. अक्षयच्या या यशामुळे सुरुलसह संपूर्ण वाळवा तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघर्षातून उभ्या राहिलेल्या या गुणवान पैलवानाच्या आंतरराष्ट्रीय भरारीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!