Edition

केरूर येथे 36.75 लाखांच्या निधीतून उभारलेल्या नवीन गोदाम इमारतीचे उद्घाटन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी.

केरूर ता.चिकोडी येथील गावातील श्री.अप्पयगौडा पाटील विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण सहकारी संघाच्या नवीन गोदाम इमारतीचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कर्नाटक विधान परिषद सदस्य तथा कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी श्री. प्रकाश अण्णा हुक्केरी तसेच चिकोडी–सदलगा मतदारसंघाचे आमदार श्री. गणेश अण्णा हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 36.75 लाखांच्या निधीतून या नवीन गोदाम इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.

निडसोसि मठाचे परमपूज्य श्री. पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या शुभ उपस्थितीत श्री. प्रकाशअण्णा हुक्केरी यांच्या हस्ते नवीन गोदाम इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

या नवीन गोदामामुळे शेतकरी, सभासद तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून अधिक सक्षम आणि चांगल्या सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांना चालना देतानाच शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी केरूर गावातील नागरिक, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, शेतकरी, सभासद आणि मान्यवर उपस्थित होते.

“केरूरसह चिकोडी–सदलगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचा विकासाचा प्रवास अविरत सुरू आहे,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!