Edition

रिपब्लिकन सेनेच्या कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी नितीन ससाने

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आजरा प्रतिनिधी : रिपब्लिकन सेना पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी आजरा तालुक्यातील आरदाळ येथील नितीन ससाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नितीन ससाने यांनी आजरा तसेच भुदरगड आणि कागल तालुक्यांतील ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रश्नांवर अनेक संघर्षात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या लढवय्या स्वभावामुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे ते सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत आले आहेत.
नियुक्तीनंतर नितीन ससाने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा कोल्हापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख आयु. अर्जुन कांबळे आणि हातकणंगले लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कामत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच आयु. अर्जुन कांबळे यांच्या हस्ते ससाने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन ससाने यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!