
कोल्हापूर/प्रतिनिधी:: उदय साळुंखे
कोल्हापूरमध्ये बाप्पाच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण पसरले असून, नुकताच ‘कोल्हापूरचा राजा’ चा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. गोल सर्कल मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात हजारो भाविकांनी व तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हजारो ड्रोनचा झगमगाट आणि प्रभावी कॅमेरा लाईट्सच्या लखलखाटात बाप्पाचे हे नयनरम्य आगमन सोहळे पाहण्यासारखे होते. रस्त्यावर दुतर्फा वाहनांची गर्दी होती, अनेक नागरिक आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांनी या आगमनाचा भाग बनण्यासाठी आले होते.
या ऐतिहासिक आगमन सोहळ्यास
————-
रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे गांधीनगर शहराध्यक्ष अंकुश वराळे विशेष उपस्थित होते.
————-
तावडे हॉटेलनजीकचा हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडला. या महोत्सवात गांधीनगरमधील सिंधी बांधवांची उपस्थिती शंभर टक्के होती, ज्यांनी बाप्पाच्या स्वागतामध्ये आपला संपूर्ण पाठिंबा दर्शवला.
विशेष म्हणजे, गांधीनगरमधील सिंधी नागरिक मोठ्या संख्येने आपल्या दुचाकींवरून आणि विविध वाहनांमधून मिरवणुकीत सामील झाले होते. बाप्पाच्या आगमनावेळी या सोहळ्यातील प्रचंड गर्दीत, गांधीनगरमधील सिंधी महिला आपल्या लहान मुलांना खांद्यावर उचलून घेऊन ‘कोल्हापूरचा राजा’ बाप्पाचे दर्शन घडवताना दिसून आल्या.
दरम्यान, बाप्पाच्या स्वागताच्या गर्दीत काही भाविकांची चप्पल पायातून निघाून गेल्याची घटना घडली, मात्र या छोट्या अडचणींकडे दुर्लक्ष करत भाविकांनी बाप्पाच्या आगमनाचा आनंद पूर्ण उत्साहाने लुटला. हा संपूर्ण सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिस कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभले.











