Edition

नागपंचमी पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी महाजन वाड्यात बैठक संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी : जगप्रसिद्ध शिराळा नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपंचमीची पारंपरिक सुरुवात असलेल्या पवित्र पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी महाजन वाडा येथे बैठक पार पडली. यावेळी पालखी पूजन, नागपूजन, पालखीचा मार्ग, अंबामाता मंदिरातील आरती तसेच संपूर्ण सोहळ्याच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागपंचमीच्या दिवशी शिराळा नगरीत लाखो भाविक दाखल होत असतात. नागपंचमीची सुरुवात महाजन वाडा येथून होऊन पूल गल्लीमार्गे ग्रामदैवत अंबामाता मंदिरापर्यंत पालखी नेण्यात येते. त्यानंतर कासार गल्लीमार्गे वैजेश्वर मंदिरापर्यंत पालखीचा परतीचा प्रवास होतो. या संपूर्ण पालखी मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच नागमंडळांच्या मिरवणुकांच्या वेळा आणि पालखीची वेळ यांचा मेळ व्यवस्थित राहावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.

यंदाही पालखी सोहळ्यात ढोल-ताशा पथक, हलगी पथक, रांगोळी काढणारे तसेच व्हिडिओ शूटिंग यांचा समावेश करण्यात येणार आहे. पालखी सोबत असलेल्या पारंपरिक मानकऱ्यांमध्ये महाजन, कोतवाल, भोई, काकडे, घडशी, गोंधळी, जोशी, सातपुते, सोनार आदी बारा बलुतेदारांशी संपर्क साधून पालखी सोहळ्याचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर सर्व नागराज मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ होतील.

नागपंचमीच्या दोन दिवस आधी पालखी मार्गाची स्वच्छता, रस्त्यावरील खड्डे भरणे, पालखीतील नागमूर्तीची स्वच्छता व रंगरंगोटी, पालखीची स्वच्छता व बांधणी, मंडप उभारणी, लाह्या आदी विविध महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बैठकीस महाजन कुटुंबीय, कोतवाल, भोई, भक्त मंडळाचे सदस्य, देणगीदार तसेच पालखी सोहळ्याशी संबंधित विविध मानकरी उपस्थित होते. पारंपरिक पालखी सोहळा शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रणव महाजन यांचेमार्फत करण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!