Edition

फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई! बेकायदेशीर स्फोटकांचा 24.72 लाखांचा साठा जप्त; एकाला अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

फलटण प्रतिनिधी, –  दि. 30 जुलै : फलटण तालुक्यातील मौजे बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरात बेकायदेशीररित्या स्फोटके साठवून ठेवल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 24 लाख 72 हजार 1 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांना 29 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7.50 वाजण्याच्या सुमारास रांजणी पुनर्वसन येथील बंद मराठी शाळेसमोरील मैदानात उभ्या असलेल्या एमएच 11 सीएच 2555 क्रमांकाच्या ट्रकमध्ये बेकायदेशीर स्फोटके साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिसांनी तात्काळ छापा टाकून ट्रकची तपासणी केली.
तपासणीदरम्यान ट्रकमध्ये कोणताही वैध परवाना नसताना लोकवस्तीच्या परिसरात निष्काळजीपणे स्फोटके साठविल्याचे आढळून आले. पोलिसांनी Ecoprime 83 mm चे 500 बॉक्स आणि Superpower 90 चे 4 बॉक्स, असे एकूण 504 बॉक्स स्फोटके तसेच संबंधित ट्रक असा एकूण रु. 24,72,001/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 454/2026 दाखल करण्यात आला असून स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(B)1(B), स्फोटके अधिनियम 1908 चे कलम 5 आणि भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 288 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये शंकरलाल बेनीराम जाट (रा. बरड, ता. फलटण) आणि हेमराज महावीर जाट (मूळ रा. भिलवाडा, राजस्थान, सध्या रा. बरड, ता. फलटण) यांचा समावेश असून हेमराज महावीर जाट याला पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!