Edition

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील शाळांमध्ये जंक फूडवर बंदी, सुरक्षित आहाराचे कडक नियम लागू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई वृत्तसेवा : राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये अन्न सुरक्षेचे कडक नियम लागू करण्यात आले असून, शाळांच्या ५० मीटर परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि हाय शुगर (HFSS) असलेल्या जंक फूडच्या विक्रीसह त्याच्या जाहिरातींवरही बंदी घालण्यात आली आहे.
राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमध्ये शिकणाऱ्या दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे मुंढे यांनी सांगितले. नवीन नियमांनुसार शाळांचे कँटीन, मध्यान्ह भोजन पुरवठादार, वसतिगृहातील मेस तसेच विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या सर्व संस्थांकडे वैध FSSAI परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवान्याशिवाय कोणत्याही पुरवठादाराकडून अन्न खरेदी करता येणार नाही.
राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘ईट राईट स्कूल’ संकल्पना राबविणे अनिवार्य करण्यात आले असून, प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी बोर्ड आणि फूड सेफ्टी सुपरवायझरची नियुक्ती करावी लागणार आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वयंपाकघर आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन यावर विशेष भर दिला जाणार आहे. FDA कडून वर्षातून किमान दोन वेळा अन्नाची तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले जाणार आहेत.
या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण व समाजकल्याण विभागाची मदत घेतली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि अन्न पुरवठादारांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!