Edition

चांदोली-शेंडगेवाडी बोगद्याखाली खड्डे आणि पाण्याचे साम्राज्य; वाहनधारक त्रस्त,.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी–चांदोली या मुख्य मार्गावरील शेंडगेवाडी बोगद्याखाली रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. चारचाकी वाहनांनाही या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत असून वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.
शेंडगेवाडी–चांदोली मार्ग हा पर्यटकांसह स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि पाण्याचे साम्राज्य यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडून अद्यापही प्रभावी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून बोगद्याखाली साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे..

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!