Edition

विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय; कोल्हापुरात शिवसेना-युवासेनेचा भव्य विजयोत्सव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतरवर देशभरातील हजारो-लाखो विद्यार्थ्यांनी पेपरफुटीविरोधात छेडलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व एकजुटीपुढे आणि संघर्षापुढे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्याचे सांगत, या ऐतिहासिक संघर्षाचा विजय कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या संघर्षाला खंबीर पाठिंबा दर्शविण्यासाठी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य विजयोत्सव व आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिक व युवासैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विद्यार्थ्यांच्या संघर्षाच्या विजयाचा जल्लोष केला.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी शिवसेना सदैव खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, शहरप्रमुख व युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तरे, शहरप्रमुख विशाल देवकुळे, माजी नगरसेवक सुनील मोदी, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे यांच्यासह सुरेश पवार, स्मिता सावंत, भरत आमटे, चैतन्य देशपांडे, रणजीत आयरेकर, सुमित मेळवंकी, दिपाली शिंदे, दिनेश साळुंखे, हर्षल पाटील, राजू यादव, विनोद खोत, ऋषी जोशी, अक्षय मोरे, कनिष्क शिंदे, दीपक गौड, महादेव कुकडे, शौनक भिडे, शुभांगी साळुंखे, विजय दरवान, तृप्ती विभूते, राज झांबरे, महादेव सुतार, मारुती कारंडे, होळकर, रुपेश रोडे, इनायत लतीफ, गीता गायकवाड, प्रथमेश देशिंगे, पवन तोरस्कर आणि अनिकेत ठोंबरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!