Edition

भाजप नगरसेवक अन्वर खान पठाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे नगरसेवक अन्वर खान दिलावर खान पठाण यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. पठाण यांनी बोगस व बनावट तडवी भिल्ल जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे नमूद करीत, सदर जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचा लेखी आदेश अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद सुद्धा रद्द होणारच आहे.
महाराष्ट्र अधिनियम अन्वये समितीसमोर झालेल्या कार्यवाहीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. समितीने दि. 22 जुलै 2026 रोजी हा आदेश जारी केला. या निर्णयावर सुजाता गायकवाड, संशोधन अधिकारी तथा सदस्य; सुरेश रामटेके, उपसंचालक तथा सदस्य सचिव; सुरेश वानखेडे, सहआयुक्त तथा उपाध्यक्ष यांच्या स्वाक्ष-या असल्याचे आदेशात नमूद आहे. समितीच्या या निर्णयामुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक पदाबाबत पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही काय होते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, समितीच्या आदेशानंतर संबंधित नगरसेवक तसेच त्यांच्या समर्थकांकडून या निर्णया बाबत काय भूमिका घेतली जाते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!