Edition

बालिंगा पंपिंग स्टेशनसमोरील मोकळ्या जागेत करवीर पोलिसांकडून वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी – बालिंगा (ता. करवीर) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करवीर पोलीस ठाण्याच्या वतीने बालिंगा पंपिंग स्टेशनसमोरील मोकळ्या जागेत सोमवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक फौजदार राहुल देसाई, पोलीस हवालदार बजरंग लाड, दिलीप घाडगे, अविनाश पोवार, सुनील देसाई, पोलीस अंमलदार सुदर्शन वर्धन, मंडळ अधिकारी संतोष पाटील, मधुकर जांभळे, संजय ठमके, बालिंगा गावातील पदाधिकारी, बालिंगा हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीची आवश्यकता आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित परिसर निर्माण करण्याची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
करवीर पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत कौतुक केले. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!