Edition

कोल्हापूर मंडळातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर, प्रतिनिधी – राज्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व नियमबद्ध आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या कायदेशीर व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे कोल्हापूर मंडळही कार्यरत असून, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे.

कोल्हापूर मंडळात बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत एकूण १ हजार ३६० खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये कोल्हापूर – ६७०, सांगली – ४५८, रत्नागिरी – १४६ आणि सिंधुदुर्ग – ८६ रुग्णालयांचा समावेश आहे.

उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हास्तरावर विशेष तपासणी पथके गठित केली जाणार आहेत. ही पथके प्रत्येक रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करणार आहेत. तपासणीदरम्यान रुग्णालयामध्ये रुग्णशुल्क व इतर सेवा शुल्काचे दरपत्रक दर्शनी भागात लावले आहे का, रुग्ण हक्क संहिता ठळकपणे प्रदर्शित केली आहे का, अग्निसुरक्षा (फायर ऑडिट) पूर्ण करण्यात आले आहे का, तसेच इतर आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याची विशेष तपासणी केली जाणार आहे.

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, आवश्यक सुविधांचा अभाव, खोटी माहिती, बेकायदेशीर कामकाज किंवा रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थांविरुद्ध बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अधिनियमातील तरतुदीनुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई कोणत्याही संस्थेला त्रास देण्यासाठी नसून राज्यातील नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि नियमबद्ध आरोग्यसेवा मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. सर्व खासगी रुग्णालयांनी नियमांचे काटेकोर पालन करून तपासणी प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

तारदाळकरांच्या एकजुटीने दोन चिमुकल्यांना शोधले; सहा तासांच्या धावपळीनंतर पालकांच्या जीवात जीव! शाळेतून घरी परतल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; ग्रामस्थ, तरुण, शिक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

traffic tail

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

error: Content is protected !!