Edition

मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची मागणी – गांधीनगर पोलिसांना निवेदन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:- प्रतिनिधी उदय साळुंखे,

उचगाव ता.करवीर येथ जन्मदात्या पित्याकडून आपल्या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून ही घटना समाजाला काळिमा फासणारी आणि निषेधार्थ आहे . त्यामुळे ही केस फास्ट्रॅक कोर्टात चालवुन नराधमास फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत अशा मागणीचे निवेदन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांना करवीर शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने देण्यात आले .
ही घटना समाजाला काळीमा फासणारी असून या नराधमाचे कोणीही वकिल पत्र घेवू नये यासाठी सोमवारी दि६ रोजी जिल्हा बार असोसिएशनला विनंती करणार आहे. असे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी स्पष्ट केले. यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, सुनील पारपाणी, शिवाजी लोहार, दीपक फ्रेमवाला, रामराव पाटील आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!