Edition

गांधीनगरात बेकायदेशीर बांधकामावर हातोडा : गांधीनगर ग्रामपंचायतीची कारवाई.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:- गांधीनगर ता. करवीर येथील सि.स.नं २६५७ मधील भाडेपट्टीदार सुभाष श्रीचंद नोतानी यांनी विनापरवाना आणि बेकायदेशीर केलेल्या बांधकामावर गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करत अतिक्रमणावर हातोडा हाणला. ही कारवाई सोमवारी सकाळी साडेआठ वाजता सुरू करून ती अकरा वाजेपर्यंत करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही कारवाई लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे आणि ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
सि.स.नं.२६५७ चे भाडेपट्टीदार म्हणून सुभाष नोतानी हे आहेत. त्यांनी या ३८७चौ.मी इतक्या जागेवर कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीररित्या बांधकाम करून २० कंटेनर केबिन ठेवल्या होत्या. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बांधकामाबाबत लेखी तक्रार तसेच उपोषण केले होते. संबंधित बांधकाम धारकाला ग्रामपंचायत प्रशासनाने रीतसर नोटीस देऊन कागदपत्राची मागणी केली होती तसेच होणारे बेकायदेशीर बांधकाम थांबवण्याबाबत सूचित केले होते. पण तरीही त्यांनी बांधकाम केले होते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर यांच्या साह्याने बेकेदेशीर बांधकामांवर कारवाई केली. यावेळी उपसरपंच विनोद हुजूराणी ग्रा,प. सदस्य निवास तामगावे, सनी चंदवानी, रितू लालवानी, पुनम परमानंदानी, रियाज सनदी, अशोक देवकुळे, दीपक जमनानी, वैशाली चौबे, प.स. सदस्य रवी मलानी कर्मचारी वर्ग यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
============
१ गांधीनगर हद्दीमध्ये शासकीय जागेतील तसेच वैयक्तिक जागेमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीर बांधकामावर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे सरपंच संदीप पाटोळे आणि ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.
============
२) ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असताना या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. आणि गांधीनगर मध्ये सध्या सुरू असणाऱ्या अशाच बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची भूमिका ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावी असा सूर घटनास्थळावरून उमटत होता.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!