Edition

दापुरी खुर्द येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत; पावसासाठी माऊलीच्या चरणी साकडे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव, वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथे श्री संत गजानन महाराज माऊलीच्या पालखीचे सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पालखीचे गावकऱ्यांनी जयघोषात स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी पालखीतील वारकरी भाविकांसाठी चहा, पाणी व फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पालखीचे दर्शन व स्वागत करण्यासाठी पोलीस पाटील खरात, सरपंच नवघरे, उपसरपंच खरात, माजी सरपंच भागवतराव लोखंडे, श्री संत गजानन बाबा मंदिराचे मठाधिपती ह.भ.प. प्रकाश पुरी बाबा, बेदरे, गोपाल लोखंडे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दापुरी खुर्द ग्रामस्थांनी श्री संत गजानन महाराज माऊलीच्या चरणी “यंदा पाऊस वेळेवर व भरपूर पडू दे आणि सर्वांवर कृपादृष्टी राहू दे,” अशी सामूहिक प्रार्थना केली. पालखी आगमनामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!